खर्डी नदीच्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत

0

तळोदा। सो मवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे खर्डी नदीला पूर आला. या पुराचे पाणी तळोदा शहरातील विविध भागात शिरल्याने हाहाकार माजला व काही घरांची पडझड होवून अनेक कुटूंब उघड्यावर आली. यात कोणतीही जिवित हानी झालेली नसून जिल्हाधिकारी व आमदारांनी पुरग्रस्तांना मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले आहे. गेले दोन दिवस शहर व तालुक्यात असलेल्या संततधार पावसाने बळीराजा सुखवाला होता. मात्र सोमवारी रात्री सातपुड्याच्या डोंगराळभागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरानजीक वाहणार्या खर्डी नदीला सोमवारी रात्री 9 च्या सुमारास अचानक मोठा पूर आला. खर्डी नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने परिसरातील पाणी गावात शिरले व या पुरामुळे नदी काठालगतच्या आदिवासी वसाहती, हट्या, भरवाड वाडा, कालिका देवी मंदिर परिसर,मातंग चौक, मराठा चौक, पाडवी हट्टी, धानका वाडा, काकाशेठ गल्ली, विद्यानागरी परिसर, कॉलेजरोड व नवीन वसाहतीत मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरले.

पाण्याने हाहाकार उडवला
या पाण्याने एवढा हाहाकार उडवला की, काही कच्च्या घरांच्या भिंती कोसळल्या. कोंबड्या, बकर्या वाहून गेल्या. काही जणांचे बांधलेले बैल पाण्यातच बांधलेले राहून गेल्याने जागेवरच मरण पावलेले आढळून आले. अनेकांचे शेतीसाहित्य, सांसारिक साहित्य वाहून गेले. तथापि लोकांनी जीव वाचविण्यासाठी धाव घेतल्याने जिवित हानी झाल्याचे आढळलेले नाही. मध्यरात्री हे वृत्त कळताच तहसीलदार, नगरसेवक आणि नेते यांच्यासह लोक मदतीला धावून गेले. लगेचच बचाव कार्य सुरु करण्यात येऊन लोकांना सुरक्षीतस्थळी हलविण्यात आले. यात नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.सदर घटना कळताच तहसीलदार योगेश चन्द्रे यांनी रात्रीच्या सुमारास पूरग्रस्त भागात जाऊन रात्री 2 वाजेपावेतो पाहणी केली.

पुनर्वसन व नुकसानीची पाहणी
तळोदा तालुक्यात दि 3 जुलै रोजी रात्री सातपुड्यालगत पायथ्याशी असलेल्या गांव परिसरात मुसळधार पाऊस झाला.पाऊसामुळे ग्रामीण भागात नदी नाल्यांना पूर आले होते.नदीनाल्याचे पाणी गावात शिरून नदीनाल्याकाठी असलेल्या घरात पुराचे पाणी गाळ शिरून मोठे नुकसान झाले आहे. मानवरूपी जीवितहानी कुठेही झाली नसल्याचे वृत्त आहे.काही गावात एक घोडा चार जनावरे मृत झाले आहे. त्या शहरातील दोन बैलाचा तर पूर्व भागातील तीन जनावरे बकर्‍या व तर्‍हावद, खेडले, चौगांव बु. प्लॉट येथे 73 कोंबड्या व पिलू मिळून मरण पावल्याचे वृत्त आहे. तर्‍हावद ,चिनोदा, खेडले या गांवांना जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मंगळे यांनी तर आ. उदेसिंग पाडवी यांनी तळोदा शहरात व चौगांव खु.प्लॉट, तर्‍हावद, खेडले, मोड, तर्‍हावद पुनर्वसन येथे नुकसानग्रस्त ठिकाणी भेट दिली व नुकसानीची पहाणी केली. त्यांच्यासोबत नगरसेवक अजय परदेशी, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र राजपूत, हेमलाल मगरे,भास्कर मराठे, संजय कलाल, शिरीष माळी किरण सूर्यवंशी आदींसह प्रांताधिकरी अमोल कांबळे,तहसीलदार योगेशचंद्र यांनी पहाणी केली.

नदीचे पात्र अरुंद असल्याने : कारण या ठिकाणी नदीचे पात्र अरुंद असल्याने पाण्याला निघण्यासाठी पुरेशी जागा ठेवणे अपेक्षित होते. मात्र असं न करता पुलाचे सदर बांधकाम करण्यात आलं आहे. मागील दोन तीन वर्षांपासून यांवर उपाय शोधण्यासाठी तिथं सार्वजनिक बांधकाम विभाग व पालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे. तथापि निष्पन्न काहीच झाले नाही. परिणामी ही आजची घटना घडली, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. काही महिला पुरुषांनी पुराची पहाणी करायला आलेल्या अधिकार्यांसमोर आक्रमक भूमिका घेत सरंक्षणभिंतीबाबतचाही प्रश्न उपस्थित केला. या पुरग्रस्तांना तातडीची मदत आणि नुकसान भरपाई मिळावी, यासाठी गटनेते भरत माळी, गौरव वाणी, संजय माळी,पंकज प्रकाश ठाकरे, राणे ,सुभाष चोधरी,आदींनी तहसीलदार चन्द्रे यांची भेट घेतली. तसेच तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. तर काही पुरग्रस्तांनी तहसील कार्यालयात धाव घेवून तहसीलदार यांना पालिके विरुद्ध निवेदन दिले.

70 टक्के घरे रात्रभर पाण्यात
तालुक्यातील तर्‍हावद पुनर्वसन वसाहत च्या तीन बाजूने पुराचे पाणी घुसल्याने वसाहत पाण्यात बुडाली होती.सत्तर टक्के घरे रात्रभर पाण्यात होती. या वसाहतीत दर पावसाळ्यात अशी परिस्थिती उदभवत असल्याचे प्रकल्प ग्रसतांना सांगितले.चौगांव बु. प्लॉट मधल्या सर आदिवासी च्या सुमारे शंभर घरात पाणी व गाळ फिरल्याने घरातील वस्तू साहित्य धान्य कपडे नुकसान झाले तर काही घराचे कुडाची व पक्की भीत पडल्या आहेत मात्र कोंबड्या बकर्‍या पाण्यात वाहून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आदिवासींचा संसार उघड्यावर आला आहे शहरासह ग्रामीण भागात नुकसानीचे पंचनामे महसूल विभागे सुरू केले आहेत यावेळी आ उदेसिंग पाडवी यांनी पहाणी करीत लवकरात लवकर तातडीची आर्थिक मदत देण्याचे सूचना महसूल यंत्रणेला दिला आहे.शहरात पालिका व पालिका प्रशासनाचा दुर्लक्ष बेजजबदार पणा मुळे खर्डी नदीचे पाणी शिरून ही परिस्थिती उदभवली असल्याचे आ उदेसिंग पाडवी यांनी म्हटले आहे. सदर पुराचे पाणी गावात शिरल्यानंतर ग्रामस्थांनी एकमेकांना सहाय्य करत भर पावसात सामानाची व्यवस्था केली. तसेच परिसरातील पाळीव प्राण्यांची पाणी गावात शिरल्याने तारांबळ उडाली होती.

शहाद्यात सतत 40 मिनिटे जोरदार पाऊस
शहादा । शहरासह परिसरात काल दि 3 सोमवार रोजी रात्री मुसळधार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले तर पहिल्यांदा गोमाई वाकी व सुसरी नद्याना भरपुर पाणी आले हा पाऊस तालुक्यात सर्वदुर झाल्याने शेतकरी आनंदीत झाला आहे आजच्या मंगळवार या आठवडे बाजारातवर पावसाचा परिणाम झाला आहे. जिल्ह्यात शहादा तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाले होते त्याची भर काल रात्री निघाली. 3 जुलैचा रात्री 8 वाजता मुसळधार पाऊस झाला सतत 40 मिनीटे जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यावरुन पाणी वहात होते. नवीन वसाहतीमध्ये पाण्याचे तलाव साचले.

शेती कामांना वेग
रामरहीम नगर, शारदानगर ,महालक्ष्मी नगर, स्वामी विवेकानंद नगर , स्वस्तिक पेट्रोल पंपाचा मागील भागात पाण्याचे तलाव साचलेत पहिल्यांदा जोरदार पाऊस झाला. कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात एच.डी.एफ.सी बंकेसमोर पाण्याचा तलाव साचला. ऱात्रीही अधुन मधुन पाऊस सुरु होता. हा पाऊस ग्रामीण भागातही झाल्याने शेती कामाना वेग आला आहे. या पावसामुळे 100% पेरण्या पूर्ण होणार आहे मे महिन्यात लागवड केलेल्या कापसाला जिवदान मिळाले आहे. पाडळदा औरंगपुर कुढावद म्हसावद चिखली राणीपुर भागात सर्वाधिक पाऊस झाल्याचे सांगण्यात आले.गोमाई नदीला पावसाळा सुरु झाल्यानंतर पहिल्यांदा भरपुर पाणी आले नदी दुधडी भरुन वहात होती या पावसामुळे कोरडे असलेल्या नद्या नाले पाणी भरुन वहात आहेत. यावर्षी सुसरी नदीच्या गाळ पूर्णपणे काढण्यात आल्याने सुसरी धरण भरण्यासाठी नदीला 3 ते 4 मोठे पुर लागण्याची शक्यता आहे.

ग्रामीण भागातील नदीनाल्यांनाही पूर
पावसामुळे ग्रामीण भागातील नदीनाल्यांनाही पूर आला असल्याने नागरिकांनी नाला किंवा नदी ओलांडताना खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. दरम्यान मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी डॉ.एम. कलशेट्टी, आमदार उदयसिंग पाडवी, नगरपालिकेचे गटनेते भरत माळी आणि काही नगरसेवक यांनी पूरग्रस्तांची भेट घेतली व त्या भागाची पाहणी देखील केली.या भेटीत अनेक नागरिकांनी जिल्हाधिकार्यांसमोर तीव्र भावना मांडतांना सांगितले की, या संकटाला पुलाचे बांधकाम कारणीभूत आहे. पाडवी हट्टीच्या मागील भागात एके ठिकाणी नदीला वळण असून याच ठिकाणी काही वर्षपूर्वी छोटा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आला आहे. हा पूल म्हणजे बांधकामाचा अजब नमुना आहे.