खर्देचा लाचखोर ग्रामसेवक जाळ्यात

0
जळगाव:- रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिर मंजूर झाल्यानंतर अनुदानाचा धनादेश देण्यासाठी दोन हजारांची लाच घेणार्‍या धरणगाव तालुक्यातील खर्दे येथील लाचखोर ग्रामसेवक सतीश सी.पाटील यास जळगाव एसीबीने सोमवारी दुपारी रंगेहाथ अटक केली. ही कारवाई जळगाव जळगावे एसीबीचे उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.