खलनायकाचा अंत ठरलेलाच;नायक बना!

0

शिंदखेडा। जगात खलनायक कधीही जिंकत नसतो त्याचा अंत ठरलेलाच असतो तरूणाईने ही बाब लक्षात घेवून नायकच झाले पाहीजे असे प्रतिपादन प्रा दिपक माळी यांनी केले. ते एमएचएसएस कनिष्ठ महाविद्यालयात गून्हेगारी आणि तरूणाई या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डी. सी. गिरासे होते. धूळे येथे नूकताच कूख्यात गूंड गूड्डया याचा निर्घूण खून झाला त्याची व्हीडीओ क्लिप व्हायरल झाली.ती क्लिप महाविद्यालयीन प्रत्येक तरूणाच्या मोबाईलमध्ये आली आणि सारेच तरूण ती क्लिप गटागटाने पाहू लागले. ही बाब लक्षात घेवून महाविद्यालयाने गून्हेगारी आणि तरूणाई या विषयावर हा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

विकृत मित्रांपासून सावध रहा
माळी पूढे म्हणाले बालवयापासूनच गून्हेगारी वृत्तीची पेरणी होत असते.गून्हेगारी वृत्ती प्रथम आपल्या मनात जन्म घेते. दूसर्‍याच्या दप्तरातून चोरून कंपास घेणे किंवा कोणतीही वस्तू घेणे यासारख्या छोट्या छोट्या वर्तनापासून गून्हेगारीची सूरूवात होते. ते पूढे वाढत जाते. त्यातून टोळी निर्माण होते. आणि गंन्हेगारीच्या मोठ्या विश्वात त्याचा प्रवेश होतो. या विश्वातिल प्रत्येकाचा अंत कोणत्या ना कोणत्या मार्गाने ठरलेलाच असतो. तो कधी कायद्याच्या माध्यमातून होतो कधी त्यांच्याच टोळी यूध्दातून होतो. तर कधी सामान्य जनताच त्याला ठेचून ठार मारते. गून्हेगारी मार्गाकडे ढकलण्याचे काम खूप वेळेला आपल्या मित्र मंडळीकडून होत असते. अशा विकृत मित्रांपासून सावध असले पाहीजे. सूखी जिवन जगायचे असेल तर त्यासाठी गून्हेगारीचा मार्ग नसतो. आई वडील, भाऊ बहीण, मूलं कूटूंब यांचा विचार करून चांगले करीअर घडविण्यासाठी अनेक मार्ग आहेत.ते निवडावे असे आवाहन माळी यांनी केले. प्राचार्य गिरासे यांनीही मार्गदर्शन केले.