खळबळजनक…कार्यमुक्त वैद्यकीय अधिकार्‍यांकडून संशयितांची तपासणी

0
जळगाव – जिल्हा शासकीय रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश खेताडे यांना कार्यमुक्त केले असताना त्यांनी 26 नोव्हेंबर रोजी रात्री पोलिसांनी आणलेल्या संशयितांची वैद्यकीय तपासणी केल्याचा प्रकार खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चौकशीत तथ्य आढळ्यास कारवाई केली जाईल, असे प्रभारी डॉ. किरण पाटील यांनी मंगळवारी स्पष्ट केले. मेडिकल ऑफीसर डॉ. दिनेश खेताडे यांना 22 ऑक्टोंबर रोजी कार्यमुक्त करून त्यांची बदली यावल येथे करण्यात आली आहे. दरम्यान सोमवारी रात्री सिव्हील हॉस्पिटलमध्ये डॉ. अजय सोनवणे हे ड्यूटीवर कार्यरत असताना डॉ. खेताडे यांनी जिल्हापेठ पोलिसांनी आणलेल्या 21 संशयितांची वैद्यकीय तपासणी केल्याचे समोर आले आहे. दरम्यान डॉ. खेताडे यांना कार्यमुक्त केल्याने त्यांनी याठिकाणी तपासणी करणे ही अयोग्य बाब मानली जात आहे. या प्रकरणी माहिती घेऊन चौकशी केली जाईल. यात तथ्य आढळल्यास कारवाई केली जाईल, असे प्रभारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले आहे. दरम्यान या प्रकारामुळे सिव्हीलच्या कारभारावर प्रश्‍न उपस्थित होत असून चर्चांना उधाण आले आहे.