नंदुरबार:कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या महामारीमुळे भटक्या-विमुक्त समाजातील कुटुंबांवर मोठा परिणाम जाणवत असून खांडबारा, बर्डीपाडा येथील ५३ कुटुंबांना मदत म्हणून विश्व हिंदू परिषद बजरंग दल नंदुरबारच्यावतीने नाथजोगी व नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या निराधार व्यक्तींना कोरडा शिधा वाटप करण्यात आला.
खांडबरा जिल्हा परिषद मराठी शाळेच्या जवळील १३ कुटुंबांना गहू, तांदुळ, तुरदाळ वाटप करण्यात आले. यावेळी विसरवाडी पोलीस स्टेशनचे एपीआय श्री.न्याहदे, सरपंच शैलेश वळवी, पद्माकर शिंदे ग्रा.पं.सदस्य वैजनाथ वळवी, अनिल शर्मा, विश्वनाथ पटेल, सुनील नाथजोगी, मनीष पटेल, राकेश पटेल, प्रफुल पटेल, पंकज पटेल, रामकृष्ण पटेल, ललीत पटेल, रामेश्वर पाटील यांच्या हस्ते कोरड्या शिधाचे वाटप करण्यात आले. बर्डीपाडा येथील चाळीस कुटुंबांना विसरवाडी पोलीस स्टेशनचे एपीआय श्री.न्याहदे यांच्या हस्ते कोरडा शिधा वाटप करण्यात आला व कोरोना या संसर्गजन्य आजाराबाबत जाणीव-जागृती करण्यात येऊन लॉकडाऊन कालावधीत सर्वांनी आपापल्या घरी रहावे, गर्दीत जाऊ नये, घरी राहून देशसेवा करण्याची संधी मिळाली असून आपण संधी सोडू नये. तब्येतीची काळजी घ्यावी आदी सूचना देण्यात आल्या. विश्व हिंदू परिषदेचे धोंडीराम शिनगर, आर.एस.माळी, अजय कासार, बजरंग दलचे ऍड.रोहन गिरासे, विवेक चौधरी, दुर्गेश चौधरी, किशोर तांबोळी, इंद्रसिंग गिरासे, महेंद्र सोनी, देवेंद्र कासार, पुरुषोत्तम काळे आदींनी शिधा वाटप कार्यक्रमाचे संयोजन केले.