खून करून मृतदेह टाकला रूळावर ? ; शेगाव लोहमार्ग पोलिसांकडून तपासाला वेग
भुसावळ- नांदुरा रेल्वे लाईनवर 30 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला असून या ईसमाची हत्या केली असल्याचा दाट संशय आहे. शेगाव लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपासाला वेग दिला आहे. राजेश रामदास राठोड (30, खांडवी, ता.जळगाव जामोद, जि.बुलढाणा) असे मयताचे नाव असून तो व्यवसायाने कालिपीली चालक आहे.
हत्या करून मृतदेह रूळावर टाकल्याचा संशय ?
राठोड यांची हत्या करून मृतदेह रेल्वे रूळावर टाकण्यात आल्याचा संशय आहे. शेगावे लोहमार्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनवीरसिंह परदेशी व सहकार्यांनी घटनास्थळी पाहणी केली. मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालानंतरच काही सांगता येईल, असे परदेशी म्हणाले. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार राठोड यांची हत्या झाल्याचा संशय असून खामगाव ग्रामीण पोलिसांनी काही संशयीतांना चौकशीकामी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.