जळगाव: भिक मागत फिरतर्या दहा वर्षीय मुलीला एका नराधामााने तुला खायला देतो असे म्हणत नराधामाने तिच्यावर शारिरीक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी भरदिवसा शहरातील गोलाणी मार्केटमध्ये घडली. घटना समोर आल्यानंतर शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले.
तिसर्या मजल्यावर घेवून गेला नराधाम
पिडीत मुलगी आपल्या आजीसोबत भिक मागून उदरनिर्वाह करते. शुक्रवारी दुपारी साधारण 1 वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटलगत असलेल्या हनुमान मंदिराच्या मागे पिडीत मुलगी उभी होती. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने तुला खायला देतो म्हणून तिला तिसर्या मजल्यावर नेले. तिसर्या मजल्यावरील एका मुतारीत नेत त्या व्यक्तीने तिच्यावर पाशवी अत्याचार केला आणि त्यानंतर तेथून पळ काढला. पिडीत मुलगी रक्ताने माखलेल्या कपडयांवर रडत रडत खाली आपल्या आजीकडे आली आणि सर्व हकीगत सांगितली. त्यानंतर आजीने पिडीत नातीला सोबत शहर पोलीस स्थानक गाठले.
शहर पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी
पोलिसांनी तात्काळ गोलाणी मार्केट गाठले. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षण अरूण निकम पिडीत मुलीकडून घटनास्थळाबाबत माहिती जाणून घेतली. पोलीस सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकाराने बालिका प्रचंड भेदललेली आहे. तिला व्यवस्थित माहितीसुद्धा सांगता येत नव्हती. बालिकेला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. नराधामाचा पोलीस शोध घेत आहेत.