तळोदा । येथील नेमसुशिल विद्यामंदिराचा सांस्कृतिक कार्यक्रमात निवेदिता रविंद्र गुरव हिने उरी येथील शाहिद जवानांना समर्पीत असे नृत्य सादर केले होते.
यात मिळालेले बक्षीस रुपी मिळालेला पैसा व तीला रोज मिळणारा रवाऊचा पैसे बचत केला होते. हे पैसे तीने सैनिक निधीत जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या स्वाधीन केले. याक्षणी निवेदिता कडून जिल्हाधिकारी कलशेट्टी यांना स्वामी विवेकानंद यांचे अग्निमंत्र हे पुस्तक भेट दिले. जिल्हाधिकारी यांनी शाळेचे आणि निवेदिताचे मनापासून कौतुक केले. निवेदिता ही नेमसुशिल इंग्लिश मिडीयमचा इयत्ता 2 री मध्ये शिक्षण घेत आहे.