रावेर:- शहरातील वाढत्या अतिक्रमणाकडे पालिका प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी दुर्लक्ष केले असलेतरी शहराचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे व त्यांच्या सहकार्यांनी अवैधरीत्या रस्त्यावर उभ्या राहणार्या हात गाड्या, अॅपेरीक्षा, चहाच्या टपरीचे अतिक्रमण काढून महमार्ग मोकळा केल्याने शहरवासीयांमधून समाधान व्यक्त होत आहे. अंकलेश्वर-बर्हाणपूर या महामार्गावर रावेर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, विवरा रीक्षा स्टॉप जवळील अतिक्रमण पोलीस निरीक्षक पिंगळे यांनी जातीने लक्ष घालून हटवल्याने विद्यार्थी तसेच नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठी सोय झाली आहे.
सतत कारवाईची गरज
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, विवरा रीक्षा स्टॉप जवळील वर्दळीच्या ठिकाणी भर रस्त्यात रीक्षा चालक आपली वाहने लावत असल्याने वाहनधारकांना मार्ग काढणे कठीण होते शिवाय या प्रकारामुळे आतापर्यंत दोन जणांचे बळीदेखील गेले आहेत. अप्रिय घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनासह पालिका प्रशासनानेदेखील कारवाई करण्याची अपेक्षा आहे.