खाकीतील कर्मचार्यावर जंक्शनमध्ये भरदिवसा हल्ला : गुन्हेगारी वाढली
रस्त्यात उभा का राहिला विचारल्याचा जाब विचारल्याने संशयीताने फायटरने केली मारहाण
A fighter attacked a Criminal in Bhusawal Police भुसावळ : गुन्हेगारीमुळे राज्यात बदनाम असलेल्या शहरात पुन्हा खाकीवर हात उचलण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली असून फायटरने केलेल्या हल्ल्यात बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार जिजाबराव पाटील जखमी झाले आहेत. या प्रकरणी संशयीताविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीत पसार झाला आहे. दरम्यान, शहरात वाढत्या चोर्या-घरफोड्या वाढल्या असतानाच आता गुन्हेगारांची दिवसागणिक हिंमतही वाढू लागली आहे. जेथे पोलिसही सुरक्षित नाहीत तेथे सर्वसामान्य जनतेचे काय? असा प्रश्न सुज्ञ नागरीक उपस्थित करीत आहेत.
समोर पाहून चाल म्हणताच केला हल्ला
शहरातील वसंत टॉकीजजवळील महाराणा प्रताप चौकात बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार जिजाबराव पाटील हे सोमवार, 21 रोजी दुचाकी (एम.एच.19 डी.आर.5675) ने जात असताना दुपारी 12.30 ते 1 वाजेच्या सुमारास संशयीत सोनू पांडे (पूर्ण नाव माहित नाही, भुसावळ) हा दुचाकीसमोर अचानक आल्याने पाटील यांनी दुचाकी थांबवली व संशयीताला रस्त्याने जाताना पाहून चाल, असे सांगितले मात्र त्याचे वाईट वाटल्याने पांडे याने आपल्याजवळील फायटरने जिजाबराव पाटील यांच्यावर हल्ला करीत शिविगाळ केली.
हल्ल्यानंतर संशयीत पसार : पोलिसांकडून कसून शोध
या हल्ल्यात पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार केल्यानंतर शुक्रवार, 25 रोजी त्यांनी तक्रार दिल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार संजय कंखरे पुढील करीत आहेत. दरम्यान, आरोपी पसार झाला असून त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.