खाजगी क्लासच्या शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला मारहाण : जळगावातील घटना

Student beaten up by private class teacher: Incident in Jalgaon जळगाव : होमवर्क न केल्याच्या रागातून खाजगी क्लासमधील शिक्षिकेने चौथीच्या विद्याथ्याचे शर्ट काढून चापटांनी मारहाण केली. याबाबत विद्यार्थ्याच्या पालकांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे.

कपडे काढून केली मारहाण
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खाजगी क्लास असून याठिकाणी 9 वर्षीय इयत्ता चौथीत शिकणार्‍या विद्यार्थ्याने क्लासमध्ये आपल्याला मारहाण होत असल्याची तक्रार वडीलांकडे केली होती. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे विद्यार्थी हा क्लासमध्ये आला परंतू होमवर्क केला नाही म्हणून शिक्षिकेने अजय याचे कपडे काढून त्यास चापटांनी मारहाण केली.

वडिलांच्या पाहणीत प्रकार उघड
क्लास सुटण्याच्या काही मिनिटांपूर्वी अचानक अजयच्या वडीलांना मुलाच्या तक्रारीत कितपत तथ्य आहे हे पाहण्यासाठी अचानक क्लासच्या वर्गात प्रवेश केला. त्यावेळी त्यांना मुलगा रडतांना आणि शर्ट विना दिसून आला. पालक समोर येताच शिक्षिकेने विद्यार्थ्यास शर्ट परत दिला. या प्रकाराचे व्हीडिओ पालकाने केला. त्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलाला मारहाण झाल्याची तक्रार दिली आहे.