Trafficking stopped: Dhule taluka police seized opium worth 18 lakhs धुळे : धुळे तालुका पोलिसांनी गस्तीदरम्यान अफूची तस्करी रोखत वाहनासह सुमारे 18 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मुंबई-आग्रा महामार्गावरील आर्वी येथे मंगळवारी सायंकाळी कारवाई करण्यात आली तर संशयीत मात्र पसार झाला.
गस्तीदरम्यान संशय आल्याने कारवाई
आर्वी येथे मंगळवार, 18 रोजी दुपारी धुळे तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी गस्तीवर असताना सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास एक महिंद्रा एक्सयुव्ही (क्र.जी.जे.01 आर.पी.1281) भरधाव जात असताना पोलिसांना संशय आल्याने त्यांनी वाहन थांबवले मात्र चालकाने रस्त्याच्या कडेला वाहन लावून पोबारा केला. वाहनात 18 प्लॉस्टीकच्या गोण्यात अफुच्या बोंडाचा तुकड्यांचा चुरा भरलेला आढळला असून त्याचे बाजारमूल्य नऊ लाख 93 हजार 180 रुपये आहे तर वाहनासह 17 लाख 93 हजार 180 रुपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आाल.
यांनी केली कारवाई
ही कारवाई नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर काळे, सुनील विंचूरकर, हवालदर प्रवीण पाटील, किशोर खैरनार, नितीन दिवसे, अमोल कापसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.