जळगाव । क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटना संलग्न महाराष्ट्र खाजगी वाहन चालक बहुउद्दशिय महासंघाच्यावतीने शासनाच्या विविध अन्यायकारक धोरणांविरोधात स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली. यात वाढती महागाई, इंधनाचे दर आणि वाहनांचा 3 वर्षांचा विमा या निर्णयांचा निषेध व्यक्त करण्यात आला. ही स्वाक्षरी मोहिम शहरातील विविध भागात राबविण्यात आली. यात अजिंठा चौफुली, नेरी नाका लक्झरी बस स्टँड आदी ठिकाणी मोहिम राबविण्यात आली.
स्वाक्षरी मोहिम राबवून मागण्याचे निवेदन हे शासन व परिवहन आयुक्तांना देण्यात येणार आहे. ही मोहिम संघटनेचे अध्यक्ष आण्णासाहेब जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात करण्यात येत आहे. यावेळी शहर अध्यक्ष सुनिल गुरव, उपाध्यक्ष विश्वास सोनवणे, रामपाल कुमावत, शफीक पटेल, खंडू चौधरी, योगेश सोनार, नरेश चौधरी, कमलाकर पाटील, विजय चौधरी, पवन गढरी, कृष्णा पाटील, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सोमनाथ बोढरे व क्रांतिकारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष उमेश जेजूरकर यांच्यासह बेदमुथा ट्रव्हलचे संचलाक मुकेश बेदमुथा, शहर संपर्कप्रमुख रोहीत पाटील आदी सहभागी झाले होते.