खाजगी सुरक्षा रक्षकांची विविध मागण्यांसाठी बैठक

0

जळगाव । जिल्ह्यांतील खाजगी सुरक्षा रक्षकांना किमान वेतन, सुट्ट्या आणि इतर अनुषंगिक लाभ मिळणे आवश्यक असून यासाठी सुरक्षा रक्षक मंडळांकडे त्यांची नोंदणी होणे आवश्यक असल्याची मागणी बैठकीत करण्यासाठी आली. बैठक सुरक्षा रक्षक युनीयनचे जिल्हाध्यक्ष फकीरा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला जिल्हाभरातून शंभर ते सव्वासे खाजगी सुरक्षा रक्षक उपस्थित होते. ज्येष्ठ कार्यकर्ते कॉ. काळूदादा कोळी यांनी मार्गदशर्नन केले. जिल्ह्यांत सुरक्षा रक्षकांच्या विविध समस्या आहेत. त्यांचे निराकरण करण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी मंडळाकडे नोंदणी न केल्यामुळे ते किमान वेतन, विमा, सुट्ट्या, कामाचे निर्धारीत तास अशा अनेक सुविधांपासून वंचित राहतात. त्यामुळे त्यांना अधिक तणावात काम करावे लागते. संघटीत कामगारांसारखे लाभ सुरक्षा रक्षकांनाही मिळणे आवश्यक असून यासाठी त्यांची तसेच त्यांचे मालक आणि एजन्सींची शासनाच्या सुरक्षा रक्षक मंडळांकडे नोंदणी होणे आवश्यक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

किमान वेतन, इतर सुविधांची मागणी
काही खाजगी सुरक्षा रक्षक पुरविणार्‍या एजेंसी त्यांच्याकडील सुरक्षा रक्षकांना एसआय, पीएफची सुविधा पुरवित नसल्याचे समोर येत असल्याने बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. दोन ते तीन महिने पगार न झाल्याने आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सुरक्षा रक्षकास कर्तव्य बजावत असतांना मृत्यू आल्यास एजेंसीतर्फे भरपाई दिली जात नसल्याची तक्रार बैठकीत करण्यात आली. सुरक्षा रक्षक मंडळाप्रमाणे खाजगी ठेकेदारांना सहाय्यक कामगार आयुक्तांकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. सहाय्यक कामगारामार्फेंत नोंदणी झाली असती तर कामगारांना सर्व सुविधा मिळतील्या असत्या, असे मत मांडण्यात आले.