भडगाव। शहरातील टोणगाव भागात गाडीचा खाटेला धक्का लागल्याच्या कारणावरून मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी घडली. याबाबत भडगाव पोलिस स्टेशनला दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस स्टेशनमधे दोन्ही गटाचा जमाव मोठ्याप्रमाणात जमा झाला होता. टोणगाव भागात जामील इतबार बेग मिर्झा यांचा मित्र नावेद बेग व गाडीचालक अनिल कोष्टी हे गाडी घेऊन येत असतांना गाडीचा धक्का खाटीला लागल्याच्या कारणावरून जमावाने मारहाण करून गाडीचे नुकसान केले.
दंगलीचा गुन्हा दाखल
याबाबत जमीलबेग इतबारबेग मिर्झा यांच्या तक्रारीवरून भडगाव पोलिसात बापु सोनवणे, कीरण मोरे, भावड्या मालचे, रविंद्र मालचे, विकी मालचे, आकाश मालचे, योगेश भिल्ल, अजय मालचे, सागर बोरसे, विनोद शंकर(व्यास), अतुल सोनवणे, सचिन नानकर, सुरेश सोनवणे, सुभाष मोरे, अक्षय बोरसे, रोहीदास मालचे, सज्जन ठाकरे, अशोक मालचे, जिभु मालचे, पमी मालचे, पार्वती भिल्ल, सुंदरा भिल्ल, नथ्था भिल्ल यांच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाविदबेग जावेदबेग रा. बाडी मोहल्ला हा मारहाणीत जखमी झाला आहे. त्यास उपचारासाठी जळगाव जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस स्टेशनला यात्रेचे स्वरूप आले होते. अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, अरविंद पाटील यांनी घटनास्थळी भेटी देऊन परीस्थितीचा आढावा घेतला. तपास पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी करत आहेत. आरसीपीच्या तुकडीला पाचारण करण्यात आले आहे. टोणगाव परीसरात बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर दुसर्या गटाच्याही गुन्हा दाखल करण्याबाबत हालचाली सुरू आहेत.