खातगाव उपकेंद्रात बॅटरींचे नुकसान

0

नवापूर । तालुक्यातील खातगाव वीज उपकेंद्रात येवुन सरकारी कामात अडथळा निर्माण करीत बॅटर्‍याची तोडफोड करून मोबाईल फोडून कर्मचार्‍यास शिवीगाळ करीत मारहाण करणार्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवापुर तालुक्यातील शिर्वे येथील हरिचंद्र दामु वळवी हे दि.22 रोजी खातगाव येथील एमएसईबीच्या विद्युत उपकेंद्रात आले. यावेळी त्यांनी येथे उपस्थित असलेल्या कर्मचार्यास शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच बॅटर्यांची तोडफोड करून मोबाईलचेही नुकसान करीत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.