शर्तभंग प्रकरणी महसुल प्रशासनाच्या पथकाने केली सीलची कारवाई
जळगाव – शहरातील मध्यवर्ती असलेल्या टॉवर चौकातील खादी ग्रामोद्योगच्या इमारतीमधील तळ मजला व पहिला मजला शासनाची परवानगी न घेता भाडेतत्वावर दिला होता. त्यामुळे शर्तभंग झाला होता. दरम्यान यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली होती. तक्रारीनुसार जिल्हाधिकार्यांनी ही जागा सरकार जमा करण्याचे आदेश दिले होते. आज जळगाव मंडळ अधिकारी योगेश नन्नवरे, तलाठी रमेश वंजारी, सिटी सर्वे विभागाचे ए.यु. कदम यांनी पोलीस बंदोबस्तात खादी ग्रामोद्योगची जागा सील करीत सरकार जमा केली.