पुणे : अन्नधान्य, डाळी, जीएसटीमुक्त आहेत. त्याचप्रमाणे खाद्यतेल, चहा व साबूदाणा आदी वस्तूही जीएसटीमधून वगळाव्यात, अशी मागणी पूना मर्चंटस चेंबरने अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे केली आहे.
देशात 1 जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी सुरू होणार आहे. या करप्रणाली संदर्भात पूना मर्चंटस चेंबरच्या शिष्टमंडळाने रविवारी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली व राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुंबईत भेट घेऊन ही मागणी केली. जीएसटी अमलात आणताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हानिहाय समित्या नेमाव्यात, अशी मागणी चेंबरच्या शिष्टमंडळाने केली. जिल्हानिहाय वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्याचे आश्वासन देतानाच व्यापार्यांना कुठलीही अडचण येणार नाही, अशी ग्वाही जेटली यांनी दिली. चेंबरच्या शिष्टमंडळात अध्यक्ष प्रविण चोरबेले, सहसचिव रायकुमार नहार, वालचंद संचेती, पोपटलाल ओस्तवाल, राजेंद्र बांठिया आदीचा समावेश होता.