खाद्यपदार्थांची जिवनशैली बदलाः डॉ.अविनाश सावजी

0

जळगाव । मानवाची पूर्वीच्या खाद्यपदार्थांपेक्षा आताची खाद्यपदार्थांची जिवनशैली बदलेली आहे. त्यामुळे मानवाचे जीवन हे वाढत नसून घटते आहे. कुपोषनामुळे मृत्यूचे तुलनेत शहरातील सुशिक्षित घटकाचे मुत्यू चे प्रमाण मोठया प्रमाणावर आहे. असे प्रतिपादन डॉ. अविनाश सावजी यांनी केले. गंधे सभागृहात कै. वैदय भालचंद्र शंकर जाहींगदार आयोजित प्रतिष्ठानतर्फे ’चढा आरोग्याची पायरी आणि टाळा फास्ट फुड’ ची न्याहरी यावर त्यांचे व्याखान झाले. अध्यक्षस्थानी डॉ. राजेश पाटील होते. सावजी यांनी, मोबाईलप्रमाणे मनुष्या चे शरीर चविष्ठ पदार्थाने हँग होत चालले आहे. खाद्यपदार्थाची रचना बदलणे काळाची गरज आहे अतिशिक्षण आरोग्यासाठी घातक ठरते आहे. गृहिणीने यासर्व घटकावर लक्ष देऊन काळजी घेणे गरजेचे आहे. महिलामध्ये आळशीपणा दिसून येतो कुटुंबाचे आरोग्य त्यांच्याच हातात आहे. नियमित व्यायाम करणे, योगासने करणे गरजेचे असल्याचा मोलाचा सल्ला त्यांनी यांवेळी दिला.