रेल्वेस्थानक परीसरात गाड्या लावण्यास परवानगी देण्याची मागणी
भुसावळ- रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यीकरणामुळे नास्त्याच्या गाड्यांसह चहा विक्री करणार्या लहान विक्रेत्यांना लोटगाड्या लावू देण्यास मनाई करण्यात आल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट कोसळले आहे. गेल्या 40 ते 50 वर्षांपासून व्यवसाय करीत असलेल्या या विक्रेत्यांवर संकट कोसळल्याने त्यांनी ध्वजारोहणासाठी आलेल्या खासदार रक्षा खडसे व डीआरएम आर.के.यादव यांना निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले. रेल्वे स्थानक परीसरात भाडे तत्वावर दुकानांसाठी जागा द्यावा वा लोटगाड्या लावू देण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी या विक्रेत्यांनी केली आहे.
हॉकर्स झोनची अंमलबजावणी करावी
रेल्वे स्थानकाच्या दक्षिण दिशेला हॉकर्स झोनची अंमलबजावणी करावी, अशी मागणी या विक्रेत्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. रेल्वे स्थानकावर मिळणारे खाद्यपदार्थ हे महाग असल्याने प्रवासी स्थानकावर हातगाड्यांवर नास्ता करतात त्यामुळे दक्षिण दिशेला हॉकर्स झोनसाठी भाड्याने जागा द्यावी अथवा तात्पुरता जागा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर राजू चौधरी, वसीम शेख, आसीफ शेख, गफार पहेलवान, चंदू भोई आदींच्या स्वाक्षर्या आहेत.