जळगाव : खाद्य तेलात भेसळ करणार्या सिंधी कॉलनीतील एक व्यापारी गेल्या 13 वर्षापासुन मध्यप्रदेशमध्ये नाव बदलवुन राहत होता. त्याला शहर पोलीसांनी मध्यप्रदेशातील बैतुल या गावातून अटक केली. सिंधी कॉलनीतील रहिवाशी अशोक दलुमल हेमलाणी (वय 62) यांचे सेंट्रल फुले मार्केटमधील दुकान क्रमांक 21 कर्मयोग सुपर बाजार होते. याठिकाणी ते खाद्यतेलाचा होलसेल व्यापार करीत. अन्न व औषध प्रशासन विभागाचे एम.एन.चौधरी यांनी तेलात भेसळ केल्याप्रकरणी 1999 साली हेमलाणी यांच्या दुकानातून तेलाचे नमुने घेतले होते. त्यानंतर नमुने मुंबई येथे प्रयोग शाळेत पाठविण्यात आले. यातच तेलात भेसळ असल्याचे प्रयोग शाळेत निषन्न झाले. त्यानुसार हमलाणी यांच्यावर शहर पोलीसांत गुन्हा दाखल झाला. यानंतर कोर्टात खटला चालला. मात्र, या गुन्ह्याचा 2003 मध्ये निकाली निघाला व त्यात हेमलाणी हे निर्दाष ठरला.
बैतुल येथून घेतले ताब्यात
यावर शासनाने उच्च न्यायालयात अपिल दाखल केले. परंतू अशोक हेमलाणी हे उच्च न्यायालयात न्यायालयीन कामकाजा दरम्यान वेळोवेळी हजर राहिले नाही. शेवटी उच्च न्यायालयाने अजामीनपात्र वारंट जळगाव पोलीस अधिक्षकांच्या नावे बजावणीसाठी काढले. पोलीस अधिक्षकांनी डीवायएसपी सचिन सांगळे यांना संशयिताचा शोध घेण्याचे सांगितले. सचिन सांगळे यांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदशनाखाली पोलीस उपनिरिक्षक दिपक गंधाले, गणेश शिरसाठे, संजय हिवरकर, निलेश पाटील, चालक संजय झोपे यांचे पथक तयार केले. संशयिताचा शोध घेत असतांना पथकाला मध्यप्रदेशातील बैतुल येथे अशोक हेमलाणी नाव बदलवुन रहिवास करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. पथकाने मध्यप्रदेशातील बैतुल गाठले. बैतुलमधील टेलिफोन कॉलनी कालपेठ विकासनगर येथून तेथील स्थानिक पोलीसांच्या मदतीने पोलीस उपनिरीक्षक दिपक गंधाले यांनी हेमलाणी याला रात्री 10 वाजता ताब्यात घेतले. यानंतर पथक गुरूवारी सकाळीच जळगावात आले.
बैतुलमध्ये सुरु केले दुकान
जळगावातुन कुटूंबांसह 2006 पासुन बैतुल येथे गेला होता. तेथे त्याने बैतुल रेडिमेड असे दुकान सुरु केले. याठिकाणी नाव बदलवुन तसेच त्याची ओळख पटू नये म्हणुन दाढी वाढली सुध्दा होती. दरम्यान, पथकाने गुप्त बातमीदारांमार्फत माहिती काढून घराचा शोध घेत अशोक हेमलाणी याला ताब्यात घेतले. यातच जळगावात आल्यानंतर त्याची डिवायएसपी सचिन सांगळे यांनी चौकशी केली. मात्र, तो मला काहीच माहित नाही अशी बतावणी करत होता.
स्वत:च्या पुतण्यालाच गंडविले
हेमलाणी याने विजया बँकेकडून 10 लाखाचे सिसी कर्ज घेतले होते. हे कर्ज न फेडता तो निघुन गेला. बँकेने जामीन असलेल्याकडून 20 लाखाची वसुली केली आहे. उर्वरित 32 लाख 44 हजार 866 रुपये वसुलीचे त्याच्याकडून घेणे आहे. यासाठी बँकेने शहर पोलीसांशी पत्रव्यवहार केला आहे. तसेच 2005 मध्ये पुतण्या वकिल हेमलाल तोलाणी यांच्याकडून वडिलांच्या नावे असलेल्या घराच्या 4 लाख 11 हजार घेतले. मात्र खरेदी खत न करता त्याने जळगावात पळ काढल्याचे समोर आले आहे.दल