भुसावळ- राज्यातील 23 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.छेरींग दोर्जे यांनी सोमवारी रात्री उशिरा काढले. बदल्या झालेल्या अधिकार्यांमध्ये खान्देशातील 9 पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. धुळ्याचे दिवाणसिंग वसावे यांची नाशिक ग्रामीण तर भगवान मथुरे यांचीही नाशिक ग्रामीणला बदली झाली. जळगाव शहरचे एकनाथ पाडळे यांची नाशिक ग्रामीण, धरणगावचे चंद्रकांत सरोदे यांची नंदुरबार येथे तसेच जळगव जिल्हा पेठचे सुनील गायकवाड यांची नगरला तर चाळीसगावचे रामेश्वर गाडे यांची नाशिक ग्रामीण तसेच नंदुरबारचे गिरीश पाटील यांचीही नाशिक ग्रामीणला बदली झाली. नंदुरबारचे दीपक बुधवंत यांची जळगावला, नंदुरबारचे संजय महाजन यांची नाशिक ग्रामीणला बदली करण्यात आली आहे. दरम्यान, नाशिक ग्रामीण येथून खान्देशात आठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.