खानदेश महोत्सवात एक कोटीची उलाढाल

0

कल्याण : खानदेशातील खादय कला,संस्कृती कृषी उत्पादनांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाने दोन दिवस कल्याणात घेतलेल्या खान्देश महोत्सवास नागरिकांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिलाण् यातुन एक कोटीहुन आधिक उलाढाल झाल्याची माहिती संयोजकांनी दिली.

मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महोत्सवास ठाणे, मुंबई नवी मु्ंबई परिसरातील सुमारे ३५ हजार खानदेशी बांधवांनी हजेरी लावल्याचे मंडळाचे प्रमुख अनिल बोरनारे यांनी सांगितले. प्रा. अरुण अहिरराव प्रा ठाणसिंग पाटील, गिरीश जोशी यांनी अहिराणी गीते ,कानबाईची गाणी व निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या ओव्या सादर केल्या. महोत्सवात आत्महत्याग्रस्त शेतक-यांसाठी ठेवलेल्या मदत कक्षात जमा झालेला निधी आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटूंबियांना देणार असल्याचेही अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.