खानापूरच्या 26 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

0

रावेर- तालुक्यातील खानापूर येथील 26 वर्षीययुवकाने 9 रोजी रात्री राहत्या घरी आत्महत्या केली. चेतन एकनाथ जाधव असे मयत युवकाचे नाव आहे. चेतन जाधव हा आपल्या कुटुंबासोबत खानापूर येथे राहत होता. 9 जुलै रोजी वेगळ्या खोलीत नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी गेला मात्र मंगळवारी सकाळी त्याची आई त्याला उठवण्यासाठी गेली असता दरवाजा उघडत नसल्याने व आतून आवाज येत नसल्याने त्यांनी शेजारच्या नागरीकांना बोलावले. दरवाजा तोडल्यानंतर चेतनने आत्महत्या केल्याचे पाहताच आईने हंबरडा फोडला. दरम्यान, चेतनने आत्महत्या का केली? याचे कारण गुलदस्त्यात असून पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह रावेर ग्रामीण रुग्णालयात हलवला. वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी शवच्छेदन केल्यानंतर मंगळवारी दुपारी शोकाकुल वातावरणात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत चेतनच्या पश्‍चात आई, भाऊ, वहिनी असा परीवार आहे. तपास पोलिस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक ढोमणे, कॉन्स्टेबल संदीप धनगर, चौधरी, वानखेडे करीत आहेत.