खानापूरला दोन ठिकाणी चोर्‍या : 70 हजारांचा मुद्देमाल लंपास

0

देशी दुकान फोडले तर घरफोडीत चोरट्यांची हात की सफाई

रावेर- तालुक्यातील खानापूर येथे रविवारी पहाटे चोरट्यांनी देशी दारूचे दुकान व घरफोडी करून करून सुमारे सत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लांबवाल. या घटनेने खानापूर परीसरात खळबळ उडाली आहे. रावेर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. खानापूर गावातील शेख खलील शेख दादामिया यांच्या देशी दारूच्या दुकानात रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी चोरी करीत
चार हजार रुपये किमतीचा आयवा कंपनीचा टीव्ही स्क्रीन, पाच हजार रुपये किमतीचे सीसीटीव्ही डीव्हीआर मशीन, अडीच हजार रुपये किमतीचे इन्व्हर्टर मशीन मशीन तर दहा हजार रुपये रोख चिल्लर लांबवली. शेख दादामिया शेख दादामिया शेख दादामिया यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक ढोमणे, संजय जाधव, नीलेश चौधरी, संदीप धनगर करीत आहेत.

देशी दारू दुकानानंतर घरही फोडले
गावातील देशी दारूचे दुकानातून चोरी केल्यानंतर चोरट्यांनी घटनास्थळाजवळ राहणार्‍या शेख आरीफ शेख कल्लू खाटीक यांच्या राहत्या घराच्या खिडकीचे लोखंडी सळही वाकवून घरात प्रवेश करीत 35 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तर 15 हजारांची रोकड लांबवली. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच तत्काळ त्यांनी श्‍वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण केले.