रावेर :- तालुक्यातील खानापूर बसथांब्यावर राणी पद्मावती चित्रपटासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयावर क्षत्रिय राजपूत समाजातर्फे काढण्यात येणार्या मोर्चाचे बॅनरर अज्ञाताने फाडल्यानंतर समाजबांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रावेर पोलिसांनी धाव घेत शांतता प्रस्थापित केली. पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.