Suicide Of a 35-year-old youth of Khanapur Village रावेर : तालुक्यातील खानापूर येथील 35 वर्षीय युवकाने विषारी औषध प्राशन करीत अआत्महत्या केली. या घटनेने खानापूरात खळबळ उडाली. याबाबत रावेर पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. गोपाळ बारी (35) असे मयत युवकाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट आहे.
रावेर पोलिसात नोंद
खानापूर गावातील रहिवासी असलेल्या गोपाळ बारी या तरुणाने बुधवारी रात्री उंदीर मारण्याचे विषारी औषध सेवन केले होते मात्र उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू ओढवला. याबाबत डिगंबर बारी यांच्या खबरीवरुन रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.