पुणे- खान्देश कन्या कवयत्री बहिणाबाई चौधरी यांची पणती भारतीय पॅराजंपर ( स्काय डायव्हर) पद्मश्री शीतल महाजन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. आकाशातून १३ हजार फूट उंचीवरून शीतल महाजन यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या. आकाशातून शुभेच्छा पत्र/ ग्रीटिंग कार्ड दाखवत पदमश्री महाजन यांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
पॅराजंम्पिंग /स्कायडाइविंगच्या अमेरिकेतिळ नॅशनल स्काइडाइविंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी शीतल महाजन गेल्या आहे. तेथूनच त्यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत दुसरे पॅराजंपर सुदीप कोडावती होते.