धुळे : ‘कानबाई माय की जय, कन्हेर राजा की जय’ चा जयघोष करत खान्देशची कुलस्वामिनी कानबाई मातेला सोमवारी मिरवणूक काढत वाजत-गाजत भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. शहरातील जुने धुळे, मोहाडी, मिलपरीसर, मोगलाई तसेच ग्रामीण भागातील अवधान, फागणे, मोराणे, वरखेडी, चितोड, रावे ,आर्वीत पारंपरिक वाद्यांच्या गजरात व डिंजेवर अहिराणी भाषेतील गीत तालावर नृत्यात फुगड्यांचा फेर धरून वाजत-गाजत नदीच्या पात्रात विसर्जन करण्यात आले.
धुळे शहर व तालूक्यात खांन्देशचे दैवत असलेल्या कानुबाई मातेच्या उत्सवाची आज सांगता झाली.सर्वत्र उत्साहाचे वातावरण आनंदाच्या वातावरण होते. ढोलताश्यांच्या गजरात कानुबाई मातेचे विर्सजन करण्यात आले. गेले आठवडाभर गावा गावामध्ये कानुबाई मातेचा उत्सव साजरा करण्यासाठी धावपळ सुरू होती. बाहेर गावी असलेले आप्तेष्ट बाळगोपाळांसह आपल्या मूळगावी असलेल्या घराकडे आलेले होते.
शहरात ठिकठिकाणी रविवारी कानूबाई मातेची मनोभावे स्थापना करण्यात होती. सायंकाळी घरोघरी रोटांचा देखील कार्यक्रम करुन कानुबाईला स्थापनेनंतर नैवेद्य दिला . कानूबाई मातेच्या ठिकाणी रात्रभर जागरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता सोमवारी स्थापना केलेल्या सर्वच कानुबाई मातेची मिरवणूक एकत्र काढून भव्य मिरणूक काढण्यात आली.
कानुबाईच्या घरात रात्रभर जागरण
रविवारी कानुमातेची आप्तेष्ट व नातेवाईक यांच्या उपस्थितीत मातेची विधीवत पूजा करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आकर्षक विद्यूत रोषणाई करून उत्सवानिमीत्त जागरण केले. रात्रभर मातेचा गोडवा गाणारी गाणी म्हटली गेली. काहि ठिकाणी भजनी मंडळाला आमंत्रित करण्यात आले होते. गावातील ग्रामस्थांनी आपल्या कुटूंबासमवेत कानबाई मातेचे दर्शन भक्तिभावाने घेतले. घरामध्ये रात्रभर उत्साहाचे वातावरण होते.