मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळाचा आज विस्तार होत आहे. या मंत्रीमंडळात २५ कॅबिनेट, १० राज्यमंत्री आज शपथ घेणार आहे. प्रथम अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी खान्देशाचे मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे गुलाबराव पाटील यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद त्यांना मिळण्याची शक्यता आहे. गुलाबराव पाटील यांच्यासोबत खान्देशातून नंदुरबारचे के.सी.पाडवी यांनी शपथ घेतली. खान्देशातून दोन जणांना कॅबिनेटची संधी देण्यात आली आहे.
गुलाबराव पाटील हे चौथ्यांदा आमदार झाले आहेत.