पुणे-तीनदा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकविणारा खान्देशातील चाळीसगाव येथील रहिवाशी विजय नथ्थू चौधरी यांची पोलीस उपाधीक्षक निवड झाली आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते कालपासून पुणे ग्रामीण पोलिसात दाखल झाले आहे. विजय चौधरी यांनी नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतले आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, पोलीस उपाधीक्षक लांबटे यांनी विजय चौधरी यांचे स्वागत करून मार्गदर्शन केले.