खान्देशातील आमदारांनी केला गिरीश महाजन यांचा सत्कार 

0
खान्देशसह राज्यातील प्रकल्पाला भरघोस निधीची घोषणा
नागपूर: खान्देशासह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या सिंचन प्रकल्पांसाठी १५,३२५ कोटी रुपयांच्या निधी पैकी ३,८३१ कोटी रुपयांचा २५ टक्क्यांचा हिस्सा देण्याबाबत मंजुरी दिली असल्याची घोषणा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत केली. यामध्ये खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील शेळगाव बॅरेजसाठी ३३७.४३ कोटी, वरखेड लोंढे साठी ४०५.२७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर धुळे जिल्हातील सुलवाडे जामफळ उपसा सिंचन योजनेसाठी २,१५७.१२ कोटी रुपयांची तरतूद असल्याची घोषणा केली आहे.
केंद्र सरकारने राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांसाठी पंधरा हजार कोटींचा निधी देण्याचे जाहिर केल्याचे निवेदन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहात केले.या योजनेसाठी राज्य सरकार ७५ टक्के रक्कम नाबार्ड आणि एशिअन बँकेकडून कर्जाच्या स्वरुपात घेणार आहे असे गिरीश महाजन म्हणाले. त्यावर सरकारने अशा अनेक पुड्या सोडल्या आहेत तशीच ही एक पुडी आहे अशी टिका जयंत पाटील यांनी केली.
आमदारांकडून ना.महाजन यांचा सत्कार 
शेळगाव बॅरेजसह खान्देशातील प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा खान्देशातील आमदारांनी विधानभवन नागपूर येथे सत्कार केला. यावेळी आमदार हरिभाऊ जावळे, उन्मेष पाटील, चंदुभाई पटेल, माजी आमदार गुरुमुख जगवाणी उपस्थित होते.