धुळे । 25 वर्षांपासून आता खान्देशच्या मायबोली अहिराणी भाषेचा प्रचार आणि प्रसार देशभरात विविध माध्यमातून होत असतानाच सकस, निर्मळ अहिराणी भाषेतील साहित्याचा शोध घेण्यासाठी पुणे येथील अहिराणी बोलीभाषा संस्कृती संवर्धनासाठी खान्देश सांस्कृतिक विकास संस्था पिंपरी चिंचवड यांनी रविवार 11 डिसेंबर 2016 रोजी प्रथम अखिल भारतीय अहिराणी महिला साहित्य संमेलन पाटीदार भवन प्राधिकरण, पुणे येथे आयोजित केले आहे. संमेलनाचा उद्घाटनाचा मान अर्थातच पाच तेजस्वी महिलांना देण्यात आला आहे. खासदार रक्षा खडसे, महापौर कल्पना महाले, महापौर शकुंतला धराडे, खासदार डॉ. हीना गावित, ज्योती निकम यांच्यासमवेत संमेलनाचे अध्यक्षपद अहिराणीसाठी प्रचंड योगदान देण्यार्या म्हसावद येथील साहित्यिका विमल वाणी भूषवित असून संमेलनास ना. जयकुमार रावल, उपजिल्हाधिकारी भागवत सैंदाणे उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात अहिराणी भाषेतील महिला साहित्यिकांना ‘हिरकणी’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यामध्ये सारिका रंधे, धुळ्याच्या मंगला रोकडे, लतिका चौधरी, वृषाली खैरनार, सुमनताई महाले यांचा समावेश आहे. डॉ. उषा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन, रत्ना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कथा कथन होईल.
यांची राहणार विशेष उपस्थिती
विशेष उपस्थितीमध्ये निलीमा मिश्रा, देविदास हाटकर, अशोक धिवरे, कॉ. संतोष पाटील, डॉ. उषा सावंत, मंगला रोकडे, लतिका चौधरी, इंदिरा महाजन, प्रा. शकुंतला चव्हाण, श्रीमती पाटकरी, वृषाली खैरनार, शोभा जाधव, रत्नाताई पाटील, प्रतिभा अहिरे, प्रतिभा ठाकूर, सारिका रंधे, मिना भोसले, सुमन पाटील, अनुराधा धोडगे, शैला पाटील, ज्योत्स्ना पाटील, साधना निकम, सुभद्रा चौधरी, जयश्री तलवारे, हेमलता पाटील, इंदूबाई पाटील, अन्नपूर्णा पाटील, मंगला पाटील, योगिता पाटील, सतीश पेंढारकर, किशोर डाऊ, सुभाष अहिरे, बापूराव देसाई, रामदास वाघ, डॉ. रमेश सूर्यवंशी, डॉ. फुला बागुल, डॉ. वाल्मीक अहिरे, जगदीश देवपूरकर, सदाशिव सूर्यवंशी, प्रकाश पाटील, नामदेवराव शिरसाठ, विठ्ठलराव कचवे, बापूराव देसाई, डॉ. संजीवकुमार, लक्ष्मण ऐलम, जगदीश पंजवाणी, शंकर पवार, कृष्णा पाटील, प्रवीण माळी, पारसमल जैन, रमेश बोरसे, नामदेव महाजन, चंद्रशेखर पाटील, कमलाकर देसले, पिंताबर लोहार, रघुनाथ पाटील, नानाभाऊ माळी, दीपेश सुराणा, अशोक माळी, प्राचार्य संजय पवार, भरत बारी आदींचा समावेश आहे.