भुसावळ : खान्देशातील सात निरीक्षकांना लवकरच पोलीस उपअधीक्षक/सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती मिळणार आहे. त्या संदर्भात पात्र राज्यातील 395 अधिकार्यांची विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार व्हटकर (आस्थापना) यांनी 3 रोजी जाहीर केली.
बढती मिळणार्या अधिकार्यांमध्ये जामनेरचे निरीक्षक शेख नाझीर अब्दुल रहमान, जळगाव नियंत्रक कक्षाचे निरीक्षक वसंत मोरे, जळगाव वाहतूक शाखेचे विलास आत्माराम सोनवणे, जळगाव एमआयडीसीचे अनिरुद्ध शेषराव आढाव, धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील संजय जगन्नाथ पाटील, शशीकांत आनंदराव महाजन, भास्कर भैरू वायफल यांचा समावेश आहे.