‘प्रवर्तन’च्या संशोधनात्मक अहवालातून माहिती उघड
जळगाव : खान्देशातील हलके गावकामगार ‘कोळी’ हेच मुळचे टोकरे कोळी / ढोर कोळी आहे अशी माहिती एका संशोधनात्मक अहवालातून उघड झाली आहे. जळगाव येथील प्रवर्तन बहुउद्देशीय संस्थेने हा अहवाल तयार केला असून या अहवालाचा शासनाचे अभ्यास करून टोकरे/ ढोर कोळी यांना आपला सवैधानिक हक्क प्राप्त करून द्यावा अशी मागणी जळगाव येथील प्रवर्तन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व जनगणना विभागाचे निवृत्त उपसंचालक शामकांत शिरसाट यांनी केली. तसेच हा अहवाल राज्य शासनाच्या आदिवासी विभाग सचिवांना सादर केला असल्याचेही शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले . यावेळी पश्चिम महाराष्ट्र अभयासक महादेव व्यंकळी , विदर्भ बेरार अभ्यासक गजानन पेटे , मराठवाडा विभाग अभ्यासक लक्ष्मण शोगोरे, यांच्यासह राज्यातील विविध विभागातील मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, डॉ. मनोहर कोळी (कोल्हापुर), महादेव व्यंकळी (कोल्हापुर), रवी कोळी सचिव, रामचंद्र साळूखे , विजय तायडे, रमेश शिरसाट, भिकाभाऊ सोनावणे, अनिल सैंदाणे, गणेश कोळी , सुनिल कोळी , प्रदीप सोनावणे, मदन शिरसाट, साहेबराव कोळी, जितेद्र सोनावणे, श्री.लखिचंद तायडे, रमेश तारू, राजिव शिरसाट, विनोद कोळी यांचे सहकार्य लाभले.
माहितीच उपलब्ध नाही ही बाब धक्कादायक- शिरसाट
महाराष्ट्र राज्यात अनुसुचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणीचे कामकाज ज्या आदीवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या नियंत्रणात पार पडते त्या प्रमुख संस्थेकडेच जळगाव, धुळे , नंदुरबार या जिल्ह्मांतील टोकरे कोळी /ढोरकोळी कोळी , कोळी महादेव, मल्हार कोळी या अनुसुचित जमातीबाबत कोणतीही माहीती उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब माहीती अधिकारातुन आमच्या समोर आली आणि प्रवर्तन बहुउद्देशिय संस्थेने खान्देश विभागातील या अन्यायग्रस्त जमातींबाबत ऐतिहासिक संदर्भांसह संशोधन करून तो अहवाल शासनास सादर करण्याची जबाबदारी घेवुन तो अहवाल प्रत्यक्षात तयार करण्यात आलेला आहे.