स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील कुराडे यांना वर्षभरासाठी दिलासा
भुसावळ- खान्देशातील 12 निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) राजकुमार व्हटकर यांनी शुक्रवारी दुपारी काढले. या बदल्यांमध्ये वार्षिक सर्वसाधारण बदल्या (जनरल ट्रान्सपर), विनंती तसेच कालावधी पूर्ण झालेल्या अधिकार्यांचा समावेश आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक सुनील कुराडे यांना वर्षभरासाठी दिलासा मिळाला असून प्रशासकीय कारणास्तव त्यांची बदली झाली नसल्याने गुन्हे शाखेची धूरा त्यांच्याकडे राहणार आहे तर खान्देशात चार निरीक्षक बदलून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बदल्यांच्या आदेशाबाबत प्रतीक्षा लागून होती. दरम्यान, सायंकाळपर्यंत वा उद्यापर्यंत सहाय्यक निरीक्षक तसेच उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश निघण्याची शक्यता असल्याचे खास सूत्रांनी सांगितले.
खान्देशातील या अधिकार्यांच्या बदल्या
धुळ्यातील निरीक्षक रामदास सुखदेव पाटील यांची ठाणे शहर, जळगावचे आदिनाथ रघुनाथ बुधवंत यांची अमरावती ग्रामीण, पाचोर्याचे शाम यादवराव सोमवंशी यांची टीआरटीआय नंदुरबार, प्रदीप खंडू ठाकुर यांची बुलढाणा, वसंत मधुकर मोरे यांची अकोला, नंदुरबारचे रामकृष्ण महादेव कुंभार यांची जळगाव तर युवराज गोबा गायकवाड यांची धुळे येथे बदली झाली.
विनंती बदलीत यांना दिलासा
जळगावचे अनिल जगन्नाथ देशमुख यांची जळगाव येथून नवी मुंबई येथे बदली झाली. धुळे प्रशिक्षण केंद्रातील शशिकांत आनंदराव महाजन यांची महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे, धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील देविदास किसन ढुमणे यांची धुळे येथे, धुळे प्रशिक्षण केंद्रातील सतीश डिगंबर डहाळे यांची पुणे शहर, धुळे प्रशिक्षण केंद्रातील सुरेश चिंतामण मनोरे यांची नाशिक ग्रामीण येथे विनंती बदली झाली.
खान्देशात बदलून येणारे अधिकारी असे
नागपुरहून शिल्पा गोपीचंद पाटील या धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात निरीक्षक म्हणून बदलून येत आहेत तर मुंबई येथून भरत दत्तात्रय जाधव यांची धुळे येथे बदली करण्यात आली आहे. अपर पोलीस महासंचालकांचे रीडर निवृत्ती गंगाराम पवार यांची नंदुरबार तसेच गुन्हे अन्वेषण विभागातून गणेश नथ्थू चौधरी यांची धुळे येथे बदली झाली.