शहादा । खान्देशाची कुलदैवत मानल्या जाणार्या कानुबाईच्या उत्सव स्थापना दि 30 जुलै रोजी झाली आहे. मात्र यावर्षी हा उत्सव किंवा स्थापना आठवड्यातुन दोनदा न होता पूर्ण खांदेशात प्रथमच केवळ दोनच दिवस हा उत्सव साजरा होणार आहे धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्व पूर्ण मानल्या जाणार्या कानुबाई उत्सवाला धार्मिक विधिची अडचण असल्याची माहिती मिळाली. केवळ 30 जुलै रविवार व 31 जुलैै सोमवार ह्या दिवशी उत्सव होणार आहे 30 जुलैला कानुबाई मातेची स्थापना होइल रात्री पारंपरिक पध्दतीने परिवाराचा दृष्टीने पूजाविधीसाठी महत्व असणारा रोटच्या कार्यक्रम होईल रात्रभर कानुबाईच्या उत्सव व स्थापना करणारे जागरण करतात कानुबाईचे गाणे म्हटले जातात तर महिला वर्ग नाचगाण्यात मग्न होतात कानुबाईच्या स्थापनेचा अनेकांनी नवस केलेला असतो. त्याची या उत्सवाच्या माध्यमातून परत फेढ होते दरवर्षी श्रावण महिन्यातुन दोन रविवारी रोटच्या कार्यक्रम होतो पण ह्यावर्षी 7 ऑगस्टला पोर्णिमा असल्याने व शिवाय रक्षाबंधन असल्याने हा उत्सवला केवळ एकच आठवडा मिळतो आहे.
यांची होती उपस्थिती
आता 31 जुलै रोजी संपुर्ण खांदेशात एकाच दिवाशी कानुबाई मातेच्या विसर्जन मिरवणूक निघणार आहे. मिरवणूकीत नाचगाण्यात महिलांची संख्या मोठी असते. शहाद्या शहरात प्रत्येक गल्लीबोळात मुख्यरस्त्यावर टोळी टोळी ने मिरवणूक दिसतात व शहराला पुर्ण यात्रेचे स्वरुप आलेले असते या वर्षी पाऊस चांगला झाल्याने नद्या नाल्याना पाणी आहे त्यामुळे कानुबाईच्या विसर्जनाला अडचण येणार नाही सर्वाधीक विसर्जन प्रकाशा ता. शहादा येथे तापी नदीच्या पात्रात केले जाते. तर काही भाविक गोमाइ पात्रात विसर्जन करतात नारायण विट्ठल कलाल यांच्या म्हणण्यानुसार नुसार कानुबाईच्या उत्सव साजरा केल्याने संपुर्ण परिवार या दोन दिवसासाठी एकत्र येतो .बाहेर गावी नोकरी निमित्त गेलेले आप्तेस्ट येवुन घरात नव चैतन्यनिर्माण होते व सर्व पारंपारिक प्रथाना उजाळा येतो. नवीन पिढीतील मुलाना संस्कृतीचे जाण होते.