खान्देशात कृषी विद्यापीठाचा आग्रह

0

शहादा। खा न्देशच्या विकासाचे स्वप्न स्वर्गीय अण्णासाहेब पी. के. अण्णा पाटील यांनी पाहीले होते. त्याकरीता सर्वपक्षीय नेत्यांनी संघटीत प्रयत्न करणे गरजेचे आहे. कृषी विकास घडवून आणण्यासाठी खान्देशचे स्वतंत्र कृषी विद्यापीठ व्हावे यासाठी आपला आग्रह आहे. सत्तेत असो वा नसो खान्देशसाठी कृषी विद्यापीठ होण्यासाठीची माझी भूमिका कायम राहणार असल्याचे प्रतिपादन माजी कृषीमंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी केले. ते पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारत व जैवनियंत्रण प्रयोगशाळेचे उद्घाटनप्रसंगी त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दीपकभाई पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रक्षा खडसे, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार उदेसिंग पाडवी, माजीमंत्री अ‍ॅड. पदमाकर वळवी, जिल्हा पोलिस प्रमुख संजय पाटील, उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, कंचनबेन पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष किशोर पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, बाजार समितीचे सभापती सुनिल पाटील, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम पाटील, उपाध्यक्ष जगदिश पाटील, सातपुडा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रेमसिंग अहेर, दुध संघाचे अध्यक्ष रविंद्र राऊळ, पो.नि. शिवाजी बुधवंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती माधव पाटील आदी उपस्थित होते.

आदिवासी विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य
कार्यक्र मास माजी उपनगराध्यक्ष विजय पाटील, माजी उपनगराध्यक्ष अरविंद क ुवर, दीपक पटेल, पंचायत समितीच े माजी उपसभापती बापूजी जगदेव, प्रा. संजय जाधव, अडॅ. पी. सी. पटेल, कमलताई पतसंस्थेचे संस्थापक एन. के. पाटील, हैदरअली नुराणी, संस्थेचे संचालक रमाकांत पाटील, जगदीश पाटील, यशवंत चौधरी, माजी नगरसेवक राक ेश पाटील, सुनिल पाटील, यशवंत पाटील, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील व पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. डॉ. विजयप्रकाश शर्मा यांनी सूत्रसंचालन तर प्राचार्य शरद पाटील यांनी आभार मानले.

खडसे मंत्रीमंडळात नसल्याची खंत
विकासाचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन संघटीत व्हावे. सद्यस्थितीत शेतकरी निसर्गाशी संघर्ष करीत आहे. प्रगत कृषी तंत्रज्ञानासाठी प्रशिक्षित होणे जरूरीचे आहे. पॉली हाऊसच्या माध्यमातून कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेणे शक्य आहे. पाणी, वेळ व श्रमाचीही बचत कृषी प्रशिक्षणातून होते. बांधावर प्रत्यक्ष जाऊन अनुभव घेतला तरच शेतीचा विकास शक्य आहे. खान्देशच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याचा पुनरूच्चार केला. आ. रघुवंशी म्हणाले, दुष्काळसदृश्य परिस्थितीत शेतकरी सातत्याने संकटांचा समाना करीत आहे. काळ्या मातीशी थेट संबंध असलेले ना. खडसे मंत्रीमंडळात राहिले असते तर उपसा सिंचनाचा प्रश्‍न सुटण्यास मदत झाली असती. याठिकाणी राजकारण विरहीत विकासाच्या मुद्यावर विविध पक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत. शेतीच्या माध्यमातून विकास शक्य होणार असल्याने नोकरीपेक्षा शेतीला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले.

दर्जेदार उत्पादनासाठी कृषी प्रशिक्षण आवश्यक
आमदार खडसे म्हणाले की, स्वर्गीय अण्णासाहेबांनी प्रतिकूल परिस्थितीत आदिवासी क्षेत्रात शैक्षणिक हब उभारले असून तिच्या संरक्षणाची जबाबदारी सर्वांची आहे. प्रगत शेतीसाठी कृषी शिक्षण आवश्यक आहे. दर्जेदार उत्पादनासाठी कृषी प्रशिक्षणाची आवश्यकता भासत असते. उत्पादनवाढीसह नविन ज्ञान आत्मसात करण्यासाठी तेवढ्याच दर्जेदार कृषी महाविद्यालयांची गरज आहे. तापी खोरे विकासाची मूळ संकल्पना स्वर्गीय अण्णासाहेबांची असून बॅरेजेसमध्ये अडविण्यात आलेले पाणी शेतीपर्यंत पोहचणे गरचेचे आहे.