- पंधराशे जवानांच्या गृपने समाजसेवेचा केला संकल्प
- एक पाऊल देश सेवे सोबत समाज सेवेकडे
- खान्देशी रक्षक गृपची पत्रकार परिषदेत माहिती
चाळीसगाव । सीमेच्या रक्षणाचे पवित्र कार्य करणारे भारतीय जवान हा देशाचा अनमोल ठेवा आहे मात्र या देश सेवकांनी सुटीवर आल्यावर देखील समाजसेवेचे व्रत पुढे सुरू ठेवण्याचा संकल्प केला आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वर एकएक करीत आठ गृप तयार करीत या जवानानी जळगाव धुळे नंदुरबार या तीन जिल्ह्यातील 1500 जवान यांनी सोबतीला पोलीस मित्रांचा सहभाग घेत खान्देशी रक्षक गृपचे गठन केले असून समाजसेवेचा बिगुल वाजविला आहे.
स्वातंत्र्य दिनी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन
या सर्व फौजी मित्रांनी आपआपल्या परीने पैसे गोळा करून पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता धुळे रोड वरील मोठ्या कॉलेजच्या रनिंग ट्रॅक वर ध्वजारोहण, जवानातर्फे परेड मारचिंग, रायफल सोबत अॅडव्हान्स डेमो, शहीद जवानांच्या माता पित्यांचा व पत्नी मुलांचा सत्कार, आत्महत्या ग्रस्त शेतकरी गरजू परिवाराला सहाय्य, संकटकाळी करावयाच्या उपाययोजना, तसेच रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. याप्रसंगी खान्देशातील सुटीवर असलेले जवान आपल्या कॅमोफ्लाईज वर्दीत उपस्थित राहणार आहेत, तर पोलिसांसह इतर जवानांनी अधिकृत वर्दीत राहतील, अशी माहिती संयोजकांनी दिली आहे.
यांनी घेतला पुढाकार
देश सेवेचे व्यस्थ जीवन जगत असतांना देखील समाज सेवा साध्य करणे ,तरुण पिढीला देश सेवे करीता उत्साहित करणे ,फौजी व पोलिसांच्या स्वतःच्या व कुटुंबियांच्या समस्यांची सर्वसामान्य3जनतेला जाणीव करून देणे यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो असल्याची भावना यावेळी जवानांनी व्यक्त केली. याप्रसंगी खान्देशी रक्षक गृपचे संस्थापक सचिन पाटील तांबोळे, उपसंस्थापक समाधान सूर्यवंशी वडाळा, सचिव राहुल रावते खेडी ब्रू , खजिनदार राजेंद्र पाटील डोंणपिंप्री, संयोजक मनोहर महाले दसकेबर्डी, सदस्य सर्वश्री राहुल पाटील हातले,, प्रवीण महाजन पोहरे, योगेश पाटील बोरखेडा, विनोद देसले व पंढरीनाथ बोराडे तांबोळे,समाधान पाटील बोरखेडा, संजय पाटील आडगाव, भास्कर महाजन पोहरे या देशाच्या विविध विभागात काम करणारे जवानांची उपस्थिती होती.