पिंपरी-चिंचवड- खान्देश एकता मंडळ दिघी पुणे १५ यांच्यातर्फे भोसरी येथे अंकुशराव लांडगे नाट्यगृहात गुरुवारी १७ रोजी दुपारी ४ वाजता खान्देश कला महोत्सव व स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात खान्देशी कलाकार आपल्या कला सादर करणार आहेत, त्यात ‘आयत पोयत सख्यान’ हे एकपात्री नाट्यप्रयोग शिरपुर येथील प्रविण माळी सादर करणार आहेत. खान्देशी ‘कानुबाई गाणे किल्लुनी भाजी कयनानी भाकर’ हा कार्यक्रम चोपडा येथील अशोक बनारसे हे सादर करणार आहेत.
या क्रार्यक्रमाचे उद्घाटन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील तसेच आमदार महेश लांडगे, लक्ष्मन जगताप, गौतम चाबुकस्वार, माजी आमदार विलासराव लांडे तसेच पि.चि.मनपाचे आजी, माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक बापुसाहेब हटकर असणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन समितीत पी.के.महाजन, कैलास बोरसे, पुंडलिक सैदाणे, नकुल महाजन, अनिल पवार, आनंद वसुर्यवंशी, सुरेश गवळी, प्रशांत महाजन, सुभाष पाटील, सुकदेव बागुल, निंबाळकर, राजेंद्र रोंदळ, संभाजी पाटील व सर्व क्रियाशील कार्यकर्ते व खान्देशी बांधव आहेत. क्रार्यक्रमाचे लाभ घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.