खान्देश नाट्य महोत्सवाची रुपरेषा आणि सन्मानिकेचे प्रकाशन

0

भुसावळ । गेल्या आठ वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेल्या खान्देश नाट्य महोत्सवास 2 जून पासून श्रीकृष्णचंद्र सभागृहात सुरुवात होणार आहे. यानिमित्त कार्यक्रमाची रुपरेषा आणि सन्मानिका प्रकाशन तसेच नाट्य महोत्सव केंद्रिय समितीची घोषणा नुकत्याच झालेल्या बैठकीत करण्यात आली. खान्देश नाट्य महोत्सवास 2010 पासून सुरुवात झाली असून 40 नाटके, परिसंवाद, चित्रप्रदर्शन, माहितीपट आणि मुलाखती अशा वेगवेगळ्या उपक्रमांनी रसिकांचे मनोरंजन आणि प्रबोधन केले जात आहे. नाट्य महोत्सव सर्वांसाठी खुला असून निःशुल्क आहे.

महोत्सव समिती गठीत
यावर्षीच्या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे नाट्य महोत्सवाचे उद्घाटन एका बहुपेडी तृतीयपंथियाच्या हातून होणार असून तीन नाटके, माहितीपट आणि वादळी मुलाखतीचा आस्वाद रसिक घेणार आहे. या महोत्सवासाठी समिती गठीत करण्यात आली असून समिती अध्यक्षपदी मोहन फालक यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून बद्रीनारायण अग्रवाल, सुरेश पाटील, सोनू मांडे, सत्यपालसिंग राजपूत, निलेश झाल्टे, विनोद ढगे, जयश्री पुनतांबेकर, डॉ. दिलीप देशमुख, अनिल कोष्टी यांचा समावेश आहे.

यांची होती उपस्थिती
या बैठकीत विनोद ढगे, अमरसिंग राजपूत, श्रीकांत जोशी, श्रीकांत कुळकर्णी, पुष्कराज शेळके, अक्षय नेहे, नयन पवार, रविकांत सुपेकर, श्रीराम पाटील, संजय चव्हाण, किरण बाविस्कर, संजय माळी, श्‍वेता पाठक, रश्मी जैन, रविंद्र कोळी, कुंदन तावडे, तेजस मराठे, माधव गरुडे, दिपक विनंते, ए.बी. सोनवणे, महेंद्र चव्हाण, स्वरदा गाडगीळ, संजय भटकर, उदय जोशी, डॉ. जगदिश पाटील, डॉ. दिलीप देशमुख, धर्मराज देवकर, योगेश गाडगीळ, देवेश कुळकर्णी, प्रथमेश जोशी, उमेश गोरधे यांची उपस्थिती होती.