खान्देश पर्यावरण संरक्षण मंडळ देणार स्वच्छतेचे धडे

0

होळनांथे। खान्देश पर्यावरण संरक्षण मंडळ शिरपूरतर्फे जागतिक पर्यावरणदिनी तालुक्यातील विविध गावांमध्ये सायकल रॅली काढून पर्यावरण संवर्धनासह स्वच्छता अभियान, स्वच्छालयाचे महत्व झाडे लावणे यासंदर्भ जनजागृती करण्यात येणार आहे. गावागावात सायकल रॅली काढून गावातील विविध चौक स्वच्छ करण्यात येतील त्यांनतर सभा घेऊन स्वच्छता व पर्यावरणाबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.

झाडे लावे प्रमाणपत्र मिळवा : खान्देश पर्यावरण संरक्षण मंडळातर्फे अनोखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. झाडे लावण्यास प्रोत्साहन मिळण्याच्या उद्देशाने झाडे लावणार्‍यास आकर्षक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच पर्यावरण संवर्धनाबाबत उत्कृष्ठ कार्य करणार्‍या व्यक्तींचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. वृक्ष लागवड योजनेत सहभागी होण्याकरीता आपले नाव, पत्ता, मोबाईल नंबर, वय, व्यवसाय, झाड लावण्याचे ठिकाण, झाडाचे नाव व फोटो आदी माहिती खान्देश पर्यावरण संरक्षण मंडळाचे अध्यक्ष हेमंत शेटे (7028391001), कार्याध्यक्ष जितेंद्र शेटे (विजय बुक स्टॉल शिरपूर) मो.9850524682 या व्हॉट्सअप नंबरवर माहिती पाठविण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

3 जूनला ग्रिन आर्मी शिरपुरात : महाराष्ट्र शासन वनविभागातर्फे पर्यावरणाचा प्रसार व्हावा या उद्देशाने संपुर्ण महाराष्ट्रभर ग्रिन आर्मी या पथकाद्वारे वृक्ष लागवडीसंदर्भ प्रबोधन करण्यात येत आहे. सदर ग्रिन आर्मी 3 जुन रोजी धुळ्याहून शिरपुरात दुपारी 3 वा.दाखल होणार असून बस स्टँड जवळील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रांगणात शिरपुर भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांच्या ÷अध्यक्षतेखाली ग्रिन आर्मी पथकाचे स्वागत करण्यात येणार आहे. तसेच यावेळी ग्रिन आमीृचे सभासद नोंदणीही करण्यात येणार असून इच्छुकांनी आधारकार्डची झेरॉक्स देऊन ग्रिन आर्मीचे सभासद होता येईल. तरी सदर कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन खान्देश पर्यावरण संरक्षण मंडळ व शिरपूर वन विभागातर्फे करण्यात आले आहे.