खान्देश माळी मंडळातर्फे वधुवर मेळावा संपन्न

0

पिंपरी-चिंचवड : खान्देश माळी मंडळ पिंपरी-चिंचवड पुणे यांच्या तर्फे भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात माळी समाजाचा १९ वा राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. राज्यभरातुन डॉक्टर इंजिनियर व उच्च शिक्षित असे दिडशे हुन अधिक समाज बांधवांनी नोंदणी करुन आपला परिचय करून दिला.

मेळाव्याचे उद्घाटन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते झाले तर प्रमुख पाहुणे म्हणून भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, नगरसेवक संजय वाबळे, संतोष लोंढे, वसंत लोंढे, नम्रता लोंढे, विजय लोखंडे हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील नगरसेवक कैलास माळी हे होते. उद्घाटनानंतर महापौरांनी असे वधुवर मेळावा घेणे काळाची गरज आहे असे सांगितले. खान्देश मंडळानी अतिशय उल्लेखनिय उपक्रम हाती घेतले आहेत असे सांगून त्यांनी भावी वधुवराना शुभेच्छा दिल्या. आमदार महेश लांडगे यांनी राज्यातील आलेल्या सर्व वधुवरानी आपला भावी साथीदार योग्य निवडावा. ती संधी तुम्हाला खान्देश माळी मंडळाने दिली आहे. हे मंडळ पुर्णपणे समाजाची सेवा अनेक वर्षे पासून करित आहे असे सांगितले.

अध्यक्षीय भाषणात कैलास माळी म्हणाले की, खान्देश माळी मंडळ राबवीत असलेले उपक्रम समाजासाठी किती प्रेरणादाई आहेत. गेल्या १९ वर्षपासून मंडळ हे करीत आहे. मंडळाचे सर्व कार्यकर्ते मनापासून समाजाची सेवा करत आहेत. सबसे बडा समाज, समाज से बडा कोही नई. तसेच एकता यशोंबिजम् हे ब्रीद प्रमाणे मंडळ काम करत आहे असे सांगून मंडळाचे कोतुक केले व शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक अध्यक्ष पी.के.महाजन यांनी केले तर सुत्रसंचालन मंडळाचे सचिव नकुल महाजन यांनी केले. स्वागत नवल खैरनार यांनी केले आणि आभार किशोर वाघ यांनी मानले. वधु-वर चर्चा, मुलाखती गोविंद माळी, प्रविण महाजन, रमेश बिरारी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पी.के.महाजन, विकास महाजन, नकुल महाजन, नाना भाऊ माळी, रघुनाथ वाघ, नेहरू महाजन, भुषण मोरे, प्रदीप देवरे, प्रशांत महाजन, नवल खैरनार, भुषण मोरे, ज्ञानेश्वर वाघ,अनिल सोनवणे, जितेंद्र चोधरी विनोद माळी शांताराम मंडळ वसंत बागुल विजय वाघ, सुरेश सोनवणे, रमेश सोनवणे, सौ.नलीणी वाघ, गणेश चोधरी, कैलास माळी, शिवाजी महाजन, भगवान माळी,सौ.लता वाघ, भिमराव माळी, दिपक बागुल, एस के.माळी, जी.जी.महाजन, उदयभान पाटील, हेमंत माळी, सुभाष माळीव सर्व क्रियाशील कार्यकर्ते व सभासद बंधू भगिनी यांनी सहभाग घेतला.