जळगाव : खान्देश माळी महासंघातर्फे पाचव्यांदा सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येत असून 5 मार्च रोजी सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विवाह सोहळ्यांची नियोजन बैठक धुळे जिल्हा अध्यक्ष प्रा.बी.बी.महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यात ही माहिती देण्यात आली. विवाह सोहळ्यात सहभागी होणार्या वधु-वरांना माळी महासंघातर्फे विनामुल्य बस्ता वाटप करण्यात येणार आहे. तसेच सामुहिक विवाह सोहळ्यासाठी शासनातर्फे देण्यात येणारे अनुदान वधु-वरांना देण्यात येईल त्यासाठी आवश्यक कागदपत्राची पुर्तता करणे आवश्यक आहे. बैठकीत विविध ठराव सर्वानुमते पारीत करण्यात आले. बैठकीस प्रा.बी.बी.महाजन, प्रा.अनिल बोरसे, संजय माळी, योगेश माळी, चिराग माळी, जिभाऊ माळी, मुरलीधर महाजन, संतोष इंगळे, वसंत पाटील, अरुण चौधरी, सुदर्शन महाजन, बापू महाजन, आबा महाजन, दिपक महाजन, रमेश माळी, प्रविण देशमुख, गजानन महाजन, आदी उपस्थित होते.