खान्देश शिक्षण मंडळावर आशिर्वादचे वर्चस्व

0

सहकार पॅनलला दोन जागांवर मानले समाधान तर एक जागा अपक्षला

आशिर्वाद पॅनलचे पाच उमेदवार विजयी

अमळनेर । अमळनेर खान्देश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीसाठी मतमोजणी येथील इंदिरा भुवनात आज सकाळी 9 वाजता प्रारंभ झाला. त्यात सकाळी 10.30 वाजता पहिला अध्यक्षपदाचा निकाल लागला त्यानंतर विश्‍वस्त पदाची मोजणी झाली व 2 उपाध्यक्षपदासाठी मोजणीस वेळ लागला त्यानंतर ब्रेक घेऊन संचालक पदांसाठी मतमोजणी दुपारी 2.30 ला सुरू झाली. येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत आशीर्वाद पॅनलच्या सात पैकी 5 जागा जिंकत खा.शि ची सत्ता काबीज केली आहे. जुन्याना नाकारत सभासदांनी चार नव्या उमेदवारांना संधी दिली आहे. आशीर्वाद पॅनलचे प्रमुख डॉ बी एस पाटील यांच्या सह , प्रदीप कुंदन अग्रवाल, योगेश मधुसूदन मुंदडे, नीरज दिपचंद अग्रवाल, आणि हरी भिका वाणी हे विजयी झाले आहेत. तर सहकार पॅनलने सहा पैकी केवळ दोनच जागेवर विजय मिळवला आहे. या पॅनलचे डॉ.संदेश बिपीन गुजराथी, जितेंद्र मोहनलाल जैन विजयी झाले असून अपक्ष कल्याण साहेबराव पाटील यांनी देखील विजय मिळवला आहे. रविवारी झालेल्या निवडणुकीचे इंदिरा भुवन येथे मतमोजणी करण्यात आली.

या प्रस्थापितांचा झाला पराभव
आशीर्वाद पॅनलचे विनोद राजधर पाटील, डॉ.अनिल शिंदे या दिग्गजासह सहकार पॅनलचे माजी कार्याध्यक्ष मोहन बालाजी सातपुते, प्रवीण साहेबराव पाटील, प्रवीण रामलाल जैन, शशांक जगन्नाथ जोशी, अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असलेले खा.शि.चे विद्यमान अध्यक्ष महेश प्रभाकर देशुमुख, दिलीप हरकचंद जैन, भारती मेघजी गाला, रंजना प्रवीण देशमुख यांचा पराभव झाला आहे. आर.के.पटेल ग्रुप.चे उद्योगपती विनोद पाटील यांचा दारुण पराभव झाला.

नवख्या ना मिळाली संधी
आशीर्वाद पॅनलचे हरी भिका वाणी, योगेश मधुसूदन मुंदडे, प्रदीप कुंदनलाल अग्रवाल, नीरज दिपचंद अग्रवाल आदीनी जुन्याचा पराभव केला आहे. तर आशीर्वाद पॅनलचे प्रमुख डॉ.बी.एस पाटील, सहकारचे डॉ.संदेश गुजराथी, जितेंद्र मोहनलाल जैन, अपक्ष कल्याण साहेबराव पाटील आदींनी आपल्या जागा कायम राखला आहेत.  सोमवारी सकाळी 9 वाजेपासून मतमोजणी करण्यात आली. रात्री 9 वाजेपर्यंत मतमोजणी सुरू होती, सुरुवातीला अध्यक्ष, उपाध्यक्ष, आणि विश्‍वस्त या पदांची मतमोजणी करण्यात आली. संचालक पदाच्या मतमोजणी च्या एकूण पाच फेर्‍या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शेवट पर्यंत उत्सुकता होती.

विजयी उमेदवार
डॉ.बी.एस.पाटील (1617), नीरज दिपचंद अग्रवाल (1792) , प्रदीप कुंदनलाल अग्रवाल (2347), हरी भिका वाणी (1676), योगेश मधुसूदन मुंदडे (1818), डॉ संदेश बिपिन गुजराथी (151), जितेंद्र मोहनलाल जैन (1698), कल्याण साहेबराव पाटील (1694)

पराभूत उमेदवार
विनोद राजधर पाटील (1407), मोहन बाळाजी सातपुते (1343), डॉ अनिल नथ्थू शिंदे (1288), प्रवीण साहेबराव पाटील (1045), दिलीप हरकचंद जैन (1256), शशांक जगन्नाथ जोशी (1215), प्रवीण रामलाल जैन (1376), प्रसाद रमेशचंद्र शर्मा (670), महेश प्रभाकरराव देशमुख (461), भारती मेघजी गाला (246), रंजना प्रवीण देशमुख (287), शंकर दत्ताराम गोयकर (36),

अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विश्‍वस्त विजयी उमेदवार
* अध्यक्षपद – अनिल मधुकरराव कदम (1335) विजयी, पराभूत उमेदवार राजेंद्र उमरावसिंग अग्रवाल (1276 ), विवेकानंद लक्ष्मण भांडारकर (1214) बाद मते 424 एकूण झालेले मतदान 4 हजार 249. * उपाध्यक्षपद – कमल आसकरण कोचर (1231 ) आणि माधुरी प्रमोद पाटील (980) विजयी तर राजीव रामराव चव्हाण (396), अमोल दिनेश पाटील (801), इंदरचंद छगनलाल जैन (870), संदीप केवलचंद जैन (658), विजयकुमार सुवालाल कटारिया (436) आणि शीला शिवाजीराव पाटील ( 856) अशी मते मिळाली. * विश्‍वस्तपद – वसुंधरा दशरथ लांडगे 1649(विजयी), अनंता रमेश निकम (1052), राधेश्याम रामविलास माहेश्‍वरी (1039) अशी मते मिळाली. बाद मते 508 असे एकूण झालेले मतदान 4 हजार 249.