जळगाव । खान्देश सेंट्रल मॉल येथे चित्रपट पाहण्यासाठ आलेल्या प्रौढाची मॉलच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने दुचाकील चोरून नेली आहे. याप्रकरणी प्रौढाने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभियंता कॉलनी परिसरातील गजानन पार्क येथे सखाराम बुधो मोरे हे कुटूंबियांसोबत राहतात तर त्यांचा फोटोग्राफीचा व्यावसाय आहे. दरम्यान, वीस ते बावीस दिवसांपहिलेच त्यांनी नवीन अॅक्टीवा मॉपेड दुचाकी खरेदी केली होती. 26 रोजी रविवार असल्यामुळे सखाराम मोरे हे शहरात खान्देश सेंट्रल मॉल येथे चित्रपट पाहण्यासाठी दुपारी 2.30 वाजता आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची विना क्रमांकाची अॅक्टीवा मॉलच्या पार्किंग झोनमध्ये उभी करून चित्रपट पाहण्यासाठी निघून गेले. सायंकाळी 4.30 वाजता चित्रपट सुटल्यानंतर मोरे पार्किंगमध्ये दुचाकी उभी केलेल्या ठिकाणी आले. तेव्हा त्यांनी त्यांची दुचाकी दिसून आली नाही. परिसरात शोध घेतला असता दुचाकी मिळून न आल्याने ती चोरीला गेल्याची खात्री झाली.