खामखेडा येथील केळीला मिळाला विक्रमी भाव

0

मुक्ताईनगर । तालुक्यातील खामखेडा येथील शेतकरी सुभाष आनंदा धनगर यांच्या शेतातील केळीला सर्वाधिकभाव मिळाला असुन प्रति क्विटल 2 हजार 1 इतका भाव देण्यात आला त्यामुळे तालुक्यातील केळी उत्पादक शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सतत दुष्काळ आणि केळीला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवाल दिल झाले आहे अशा परीस्थीतीत खामखेड्याचे शेतकरी सुभाष धनगर यांच्या बागेतील केळीला प्रथमच 2 हजार 1 रुपये भाव मिळाल्याने त्या परीसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे

केळीला प्रथमच मिळाला सर्वाधिक भाव
तालुक्यातील पुरणाड फाट्यावरील तापी पुर्णा केला ग्रुपचे संचालक सुभाष पाटील व गोकुळ पाटील यांनी खामखेडा येथील शेतकरी सुभाष धनगर यांच्या बागेतील 40 हजार केळी खोडापैकी 8 हजार केळी खोडामधून 140 क्विटल रास मालाचा उचल केला. त्यानुसार बर्‍हाणपुर येथे 2 हजार 160 रुपये भाव असल्याने धनगर यांना 2 हजार 1 रुपये भाव देण्यात आला हा भाव पाहता तालुक्यातुन सर्वात ज्यास्त भाव मिळाले असल्याची माहिती तापी पुर्णा केला गृपचे संचालक सुभाष पाटील यांनी दिली. दरम्यान, 8 हजार केळी खोडापासुन आतापर्यंत 600 क्विंटल मालाचे उत्पन्न सुभाष धनगर यांनी घेतले आहे. गुढीपाडव्यापर्यंत 150 क्विंटल उत्पन्नाचे उद्दिष्ट असल्याचे धनगर यांनी सांगितले. शिवाय हाच भाव कायम राहिल्यास शेतकर्‍यांच्या मेहनतीचे सोने होईल, अशी भावना व्यक्त केली. यावेळी परेश पाटील, दिलीप पाटील, कैलास कोळी उपस्थित होते. इतर शेतकर्‍यांनी पेढे भरुन त्यांचे स्वागत केले. 2 हजार 1 रुपये भाव मिळाल्याने या भागातील शेतकर्‍यांनी पेढे वाटुन या घटनेचे स्वागत केले. शेतकरी समाधानी आहेत. इतका जास्त भाव प्रथमच मिळाला असल्याचे सांगण्यात आले.