खामखेडा रस्त्यावरील पाईप लाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी

0

मुक्ताईनगर- मुक्ताईनगर-खामखेडा रस्त्यावरील महादेव मंदिराच्या समोरच ओडीए पाईपलाईन गेल्या अनेक दिवसांपासून फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी दररोज होत असूनही संबंधित विभाग मात्र दखल घेत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. खामखेडा रस्त्यावरील महादेव मंदिरासमोरच गेल्या आठ ते दहा दिवसांपासून 81 गावांना पाणीपुरवठा करणार्‍या योजनेची पाईपलाईन फुटली आहे. दररोज हजारो लिटर पाणी वाहून जात आहे मात्र आठ ते दहा दिवस उलटूनही पाणीपुरवठा विभागाला जाग आलेली नाही. या संदर्भात वेळोवेळी स्थानिक ग्रामस्थांनी तक्रारीदेखील पाणीपुरवठा विभागाकडे केल्या. आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड.राहुल पाटील यांनी या संदर्भात उपविभागीय अभियंता पाणीपुरवठा विभाग यांच्याकडे तक्रारी अर्ज केला असून पाण्याची नासाडी तत्काळ थांबवावी, अशी मागणी केली आहे. गेल्या दहा दिवसांपासून पाण्याची नासाडी होत असताना सुद्धा संबंधित विभाग दखल घेत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.