मुंबई । रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व खारघर मॅरेथॉन कमिटीतर्फे आयोजित करण्यात येणारी साल 2018 मधील राज्यस्तरीय खारघर मॅरेथॉन स्पर्धा काही अपरिहार्य कारणास्तव यंदा पुढे ढकलण्यात आली असून हि स्पर्धा जुलै 2018 मध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम् प्लेक्स व खारघर मॅरेथॉन कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी जानेवारी महिन्यात खारघर येथे राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली जाते. जनजागृतीसोबत उत्तम, नीटनेटके आणि शिस्तबद्ध आयोजनामुळे हि स्पर्धा नेहमीच क्रीडा रसिकांसाठी आकर्षण ठरली आहे. त्यामुळे या स्पर्धेची उत्सुकता कायम राहिली आहे. मात्र, यंदाची खारघर 2018 मॅरेथॉन स्पर्धा काही अपरिहार्य कारणामुळे जुलै महिन्यात घेण्यात येणार असून यामुळे संबंधित हितचिंतक, धावपटू, क्रीडारसिक यांना होणार्या गैरसोयीबद्दल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजक रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स व खारघर मॅरेथॉन कमिटीने दिलगिरी व्यक्त केली आहे.