खालापुर बाजार समितीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन

0

खालापुर : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून सहकार क्षेत्राची वाटचाल सुरू असतानाच खालापूर तालुका कूषी उत्पन्न बाजार समितीने नूतन कार्यालय निर्माण केले. सन 1963 मध्ये स्थापना झालेल्या बाजार समितीचा कारभार आता स्वमालकीच्या नूतन वास्तूमधुन चालणार आहे. या वास्तूचे उदघाटन माझ्या हस्ते होणे हे भावपुर्ण आणि आभिमानास्पद असल्याचे मत ज्येष्ट नेते अनंतराव देशमुख यांनी व्यक्त केले. खालापुर बाजार समितीच्या नव्या वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. रायगडातील बहुतांशी बाजार समित्यांवर शेकापचे वर्चस्व आहे. पारर्दशक आणि विकासाभिमुख कार्य करणार्याश खालापुरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यकारिणीचे त्यांनी कौतुकही केले.

भविष्यात खालापुर बाजार समिती महाराष्ट्रात नावारुपास येईल
शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी दाखविलेला विश्वास या समितीचे सभापती संतोष जंगम यांनी सार्थ ठरविला आहे. भविष्यात खालापुर बाजार समिती महाराष्ट्रात नावारुपास येईल, असेही देशमुख म्हणाले. याप्रसंगी शेकापचे जिल्हा सहचिटणीस किशोर पाटील, राज्य कार्यकारणीचे सदस्य रामचंद्र देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक प्रविण लाले, खालापुरच्या नगराध्यक्षा शिवानी जंगम यांनी विचार व्यक्त केले. अॅणड. रामदास पाटील यांनी आभार मानले या कार्यक्रमास समितीचे सर्व सदस्य खालापुर नगर पंचायतीचे लोकप्रतिनीधी व तालुक्यातील अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते.